आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : फिल्मफेअर अवॉर्डमध्ये रणबीर कपूर-विद्या बालनची बाजी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चित्रपट क्षेत्रातील प्रतिष्ठेचा समजला जाणारा 58व्या आयडिया फिल्मफेअर पुरस्कार सोहळा रविवारी थाटात पार पडला. मुंबईतील अंधेरी येथील यशराज फिल्म स्टुडिओत बॉलिवूडच्या तारेतारकांच्या उपस्थितीत हा अवॉर्ड सोहळा रंगला. शाहरूख आणि सैफ अली खान यांच्या जोडीने या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

या अवॉर्ड सोहळ्यात रणबीर कपूरच्या 'बर्फी' सिनेमाने तब्बल 7 पुरस्कार पटकावत बाजी मारली. सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून रणबीर कपूर याचीच निवड झाल्याने या सोहळ्याचा गोडवा आणखी वाढला. तर 'कहानी' सिनेमासाठी विद्या बालनने सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावला.

2012 या वर्षात अनेक उत्कृष्ट कलाकृती प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. त्यामुळे या अवॉर्ड सोहळ्यात कोणता सिनेमा, अभिनेता, अभिनेत्री, दिग्दर्शक बाजी मारणार याची उत्सुकता होती.

फिल्मफेअर पुरस्कार आपल्या नावी करणा-या कलाकारांची नावे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...