आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'मुंबई सागा'मध्ये काम करण्यास तयार झाले जॉन-अनिल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईच्या गेल्या 35 वर्षांच्या इतिहासावर आधारित सिनेमा बनवण्याचा निर्णय संजय गुप्ता यांनी घेतला आहे. हा सिनेमा दोन महत्वपूर्ण लोकांच्या जीवनपट आणि यादरम्यान मुंबईमध्ये प्रत्येक दशकात आलेल्या बदलावर बेतलेला आहे. त्यातील एक आहे डॉन जो मुंबईच्या फुटपाथवर भाजी विकण्यापासून स्वत:चे आयुष्याची सुरूवात करतो.
वेळ, काळ आणि मोठ्या महत्त्वकांक्षेचे स्वप्न त्याला गुन्हेरीच्या वाटेला नेतात आणि तो डॉन बनतो. तो सर्व मुंबईवर राज्य करायला लागतो. ही भूमिका जॉन अब्राहम साकारणार आहे. हा डॉन 80 आणि 90च्या दशकातील मुंबई मोठ्या पडद्यावर दाखवणार आहे. दुसरी भूमिका आहे, एका महत्वपूर्ण पात्राची. काजो नावाचा एक व्यंगचित्रकार आणि पत्रकार मुंबईमध्ये पसरलेल्या अव्यवस्थांना बदण्याच्या प्रयत्नात स्वत:चे नियम बनवतो.
या पात्रांना काल्पनिक असल्याचे सांगितले जात आहे. परंतु सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही कथा पूर्णत: बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनपटाने प्रेरित आहे. ही भूमिका अनिल कपूर साकारणार आहे. यापूर्वी जेव्हा रामगोपाल वर्मा यांनी अमिताभ बच्चन यांना घेऊन 'सरकार' सिनेमा बनवला होता. तेव्हा या सिनेमाच्या पटकथेविषयी बाळासाहेब ठाकरे यांना वेळोवेळी माहिती देत होते.