आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘खूबसूरत’चे कामदेखील पाहतात अनिल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीवी मालिका ‘24’ नंतर आता अनिल कपूर ‘वेलकम बॅक’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये गुंतले आहेत. याबरोबरच ते ‘खूबसूरत’ चित्रपटाचे प्रॉडक्शनदेखील सांभाळत आहेत.

अनिल कपूर आपल्या दोन मुलीला भेटण्यासाठी बिकानेरला गेले होते. सोबत पत्नी सुनीतादेखील होत्या. त्यांच्या मुली सोनम आणि रिया तेथे खूबसूरत चित्रपटाची शूटिंग करत आहेत. तेथे ते सुटी घालवण्यास नव्हे तर खूबसूरत चित्रपटाचे निर्माते म्हणून गेले होते. त्यांनी सांगितले की, ‘मी खूपच आरामात काम करणारा निर्माता आहे. मी संपूर्ण क्रू-मेंबरसोबत बसतो. त्यांना कोणत्याही प्रकारची असुविधा आहे का, हे बघतो. रोज सेटवर येतो. खरं तर, रोजचे काम रियाच पाहते. ती खूप हुशार आहे. मी तर फक्त सगळे काम सुरळीत आणि सगळी टीम खूश आहे का, पाहत असतो.’ मी त्या निर्मात्यांपैकी नाही जे प्रत्येक गोष्टीत अडवून धरतात आणि प्रत्येक मिनिटांचा हिशोब ठेवतात, असेही ते म्हणाले.