आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'बॉम्बे वॅल्वेट’च्या अडचणी वाढल्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनुराग कश्यपच्या अतिमहत्त्वाकांक्षी ‘बॉम्बे वॅल्वेट ’ या सिनेमाला अडचणीने वेढले आहे. आधी अनिल कपूरचा मुलगा हर्षवर्धन, जो श्रीलंकेत अनुरागकडून दिग्दर्शनाचे धडे घेत होता. आजारी झाल्यामुळे मुंबईला परतला आहे आणि कधीच परत न जाण्याची शपथ घेतली आहे. शिवाय तेथे पावसामुळे बर्‍याच सामानाचे नुकसान झाले. एवढेच नव्हे तर अनुरागवर कर चोरीचादेखील आरोप लागला आहे. त्यांच्या कार्यालयाची तपासणीदेखील झाली, शिवाय त्यांना 3 सप्टेंबरला हजेरीसाठी मुंबईला यावे लागले. त्यामुळे जसा-तसा पहिला भाग पूर्ण झाला. यातून सुटकेचा श्वास घेताच सिनेमाची चिफ असिस्टंट डायरेक्टर दीपिका गांधी सेटवर झालेल्या एका अपघातात जखमी झाली. त्यांना रुग्णलयात भरती करण्यात आले आहे. सिनेमाच्या दुसर्‍या भागापर्यंत ती बरी व्हावी, अशी आशा केली जात आहे.