आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Anushka Sharma, Katrina Kaif And Vidya Balan Plys Lady Jajus In There Upcoming Films

अनुष्का, विद्या, कतरिना होतील ‘लेडी जासूस’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्या बॉलिवूडमध्ये गुप्तहेर पात्र असणार्‍या चित्रपटांची लाट आली आहे. यात रणबीर कपूरचा ‘जग्गा जासूस’, सुशांत सिंह राजपूतचा ‘डिटेक्टिव्ह व्योमकेश बक्षी’ आणि अर्शद वारसीचा ‘मि. जो बी करवाल्हो’ येत आहेत. या डिटेक्टिव्ह होण्याच्या स्पर्धेत पुरुष अभिनेत्यांबरोबर नायिकादेखील त्यांच्या बरोबरीने येत आहेत.
नवा दिग्दर्शक समर शेख यांच्या चित्रपटात विद्या बालन ‘बॉबी जासूस’ च्या रूपात दिसणार आहे. अनुष्का शर्मा आपल्या सहनिर्मितीत बनत असलेल्या ‘एनएच 10’ मध्ये गुप्तहेर झाली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक नवदीपसिंह आहेत. याचप्रमाणे कतरिना कैफदेखील ‘जग्गा जासूस’मध्ये हेरच्या भूमिकेत आहे. खरं तर तिच्या पात्राविषयी आणखी माहिती मिळालेली नाही.
‘बॉबी जासूस’ चित्रपटाची शूटिंग पुढच्या वर्षी सुरू होईल आणि 2014 च्या अखेरपर्यंत प्रदर्शित होईल, असे विद्या बालनने सांगितले.
नवदीप सिंह यांच्या चित्रपटात अनुष्काचे पात्र प्रमुख आहे. अनुष्काला चित्रपटाची पटकथा खूप आवडली होती, त्यामुळे तिने चित्रपट निवडल्याचे ती म्हणाली आहे. या कथेत ती आपल्या प्रवासादरम्यान एका गुन्हेगाराचा शोध लावते. चित्रपटात अँक्शन दृश्यदेखील अनुष्काने केली आहेत. सगळे काही ठीक राहिले तर या तिन्ही तारकांपैकी अनुष्काचा ‘एनएच 10’ सर्वात आधी प्रदर्शित होईल.