बॉलिवूडमध्ये सध्या अनुष्का शर्माच्या लिप-सर्जरीची जोरदार चर्चा रंगतेय. अनुष्काने खरंच लिप-सर्जरी केली नाही यावर सुरुवातीला चर्चा रंगली. मात्र 'कॉफी विथ करन' या शोमध्ये अनुष्काने आपला सहभाग नोंदवल्यानंतर तिने लिप-सर्जरी केल्याची गोष्ट स्पष्ट झाली. तिच्या ओठांचा आकार पहिलेपेक्षा आता वेगळा दिसतोय.
अनुष्का मात्र सर्जरी करुन घेतल्याची गोष्ट नाकारतेय. मात्र तुम्ही स्वतः बघू शकता, पहिले अनुष्काच्या वरील बाजूच्या ओठांच्या मध्ये हलकी सूज दिसत होती. मात्र आता तिचं हे ओठ सपाट दिसतंय. शिवाय तिच्या नाकाच्या लांबीतही थोडा फरक दिसून येतोय. आगामी 'बॉम्बे वेलवेट' या सिनेमात अनुष्काचा हाच लूक दिसणार आहे.
अनुष्काची सध्या जेवढी चर्चा होत आहे, ती पाहून dainikbhaskar.comने आपल्या
फेसबुक पेजवर एका सर्वे करुन याविषयी वाचकांची मतं मागवली होती. या सर्वेत अनुष्काची दोन छायाचित्रे दाखवण्यात आली. या छायाचित्रांमध्ये अनुष्काच्या ओठांमधील अंतर दाखवण्यात आले आणि यापैकी तिचा कोणता लूक वाचकांना जास्त भावला, याविषयी त्यांना प्रश्न विचारला गेला.
भलेही अनुष्का ही लिप-सर्जरी करुन आनंदी असेल, मात्र तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल, की 80 टक्के लोकांनी अनुष्काचा नवीन लूक नापसंत केला आहे. लिप-सर्जरी करण्यापूर्वीचाच अनुष्काचा लूक तिच्या चाहत्यांना पसंत आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन पाहा अनुष्काची खास छायाचित्रे आणि तुम्हीच ठरवा तिचा कोणता लूक तुम्हाला भावतोय...