आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनुष्काने पहिल्यांदा दिले स्पष्टीकरण, 'नाही केली ओठांवर सर्जरी'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या खूप चर्चेत आहे. ती सिनेमांमुळे नाही तर तिच्या खासगी आयुष्य आणि ओठांमुळे चर्चेत आहे. हो खरचं, अनुष्का सिनमांपेक्षा तिच्या खासगी आयुष्यामुळेच चर्चेत राहत आहे.
गेल्या रविवारी (9 फेब्रुवारी) प्रसारित झालेल्या करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' या चॅट शोमध्ये अनुष्काने भेट दिली होती. या शोमध्ये तिच्यासोबत दिग्दर्शक अनुराग कश्यपसुध्दा उपस्थित होता. त्यावेळी ती पहिल्यापेक्षा खूपच वेगळी दिसत होती.
शो प्रसारित होण्यापूर्वी समोर आलेल्या ट्रेलरमुळे अनुष्का चर्चेत आली होती. करणच्या शोचा ट्रेलर जेव्हा समोर आला तेव्हा अनुष्का त्यामध्ये खूप वेगळी दिसत होती. विशेष म्हणजे तिच्या ओठांचा आकार पहिल्यापेक्षा वेगळा दिसत होता. तेव्हापासून सुरू झाली अनुष्काच्या ओठांची चर्चा.
ट्रेलरमध्ये अनुष्काला बघितल्यानंतर काहींचे म्हणणे होते, की तिने ओठांवर शस्त्रक्रिया केली आहे. अशाप्रकारे तिच्या ओठांच्या बाबतीत अनेक अंदाज व्यक्त केले गेले. परंतु आता अनुष्काने टि्वटरवर याविषयी स्पष्टीकरण दिले आहे. तिने सांगितले, की आगामी सिनेमासाठी तिने ओठांचा आकार बदलला आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि वाचा अनुष्काने टि्वटरवर काय लिहिले...