आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आठवड्यातून केवळ एकच दिवस काम करते अर्चना, विदाऊट मेकअप दिसते अशी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


अभिनेत्री अर्चना पूरण सिंह छोट्या पडद्यावरची प्रसिद्ध सेलिब्रिटी आहे. अर्चनाने बॉलिवूडमधील अनेक सिनेमांत काम केले आहे. याशिवाय कॉमेडी शोजमध्ये मोठ-मोठ्याने हसण्यासाठी अर्चनाला ओळखले जाते. आज (26 सप्टेंबर) अर्चनाचा वाढदिवस आहे.

'कुछ कुछ होता है' या सिनेमातील मिसेस ब्रिगेन्जा म्हणून अर्चना प्रसिद्ध झाली होती. त्यानंतर तिने मोहब्बते, बोल बच्चन, क्रिश यांसह ब-याच सिनेमात आपल्या अभिनयाची छाप सोडली. सध्या अर्चना सोनी वाहिनीवर प्रसारित होणा-या कॉमेडी सर्कस या शोची जज आहे. या शोमध्ये मला फक्त हसण्याचे पैसे मिळत असल्याचे अर्चनाने एका मुलाखतीत म्हटले होते. अर्चना आठवड्याभरात केवळ एकच दिवस काम करते आणि सहा दिवस सुटीवर असते. एक दिवस काम करण्यासाठी तिला मोठी रक्कम मिळले.

रंजक गोष्ट म्हणजे, आत्तापर्यंत या शोचे 1006 एपिसोड प्रसारित झाले असून अर्चना एकमेव अशी जज आहे, जी आत्तापर्यंतच्या सर्व सिझनमध्ये जजच्या खुर्चीत दिसली.

अर्चनाच्या वाढदिवसाचे औचित्य साधत एक नजर टाकुया तिच्या करिअरवर...