आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS: सीसीएलच्या मैदानावर अरमान-तनिषाला पडला जगाचा विसर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सेलिब्रिटी क्रिकेट लीग (CCL)च्या मुंबई हीरोज संघामध्ये सामील झालेला अभिनेता अरमान कोहली सध्या त्याची खास मैत्रीण तनिषा मुखर्जीसोबत त्याचा मौल्यवान वेळ घालवत आहे. काही दिवसांपूर्वी दोघेही दुबईच्या स्टेडिअममध्ये दिसले होते. मुंबई हीरोज टीमचा सदस्य अरमान सध्या क्रिकेट खेळत नाहीये.
CCLच्या सुत्रांच्या सांगण्यानुसार, दोघेही एकमेकांमध्ये इतके गुंतले होते, त्यांना आजुबाजूच्या लोकांचेसुध्दा भान नव्हते. तनिषा मागच्या आठवड्यात एका मराठी सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. या आठवड्यात तिने तिचा वेळ प्रियकर अरमान कोहलीला दिला आहे.
अरमान आणि तनिषा टीव्ही रिअ‍ॅलिटी शो 'बिग बॉस 7'मध्ये त्यांच्या अफेअरमुळे बरेच चर्चेत होते. शो संपल्यानंतरसुध्दा दोघे अनेकदा काही कार्यक्रमात एकत्र दिसले होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा अरमान-तनिषाच्या भेटीची काही छायाचित्रे...