मुंबई - इंडिया टुडेच्या वतीने आयोजिक कॉन्क्लेवमध्ये अभिनेता
सलमान खानने आपल्या लग्नाचे संकेत दिले होते. तो म्हणाला होता, की यावर्षीच्या शेवटी तो लग्न करु शकतो. मुलगी भारतीय नसून परदेशी असल्याचेही तो म्हणाला होता. सलमानचा इशारा लुलिया वेंटूरकडे होता.
सलमानच्या लग्नाची बातमी देश-परदेशात वा-यासारखी पसरली. या बातमीमुळे सलमानच्या चाहत्यांना नक्कीच आनंद झाला. मात्र त्याची धाकटी बहीण अर्पिता खान या बातमीमुळे नाराज झाली आहे.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काही वृत्तपत्रांचे प्रतिनिधी सलमानच्या लग्नाविषयी अर्पिताशी बोलू इच्छित होते. मात्र आपल्या भावाच्या लग्नाच्या बातमीमुळे ती आनंदी दिसली नाही आणि तिने याविषयी मौन बाळगले.
मिळालेल्या माहितीनुसार, अर्पिता लुलियाला वहिनी म्हणून पसंत करत नाही. तिच्या मते लुलिया सलमानच्या नावाचा वापर नाव आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठी करतेय.
पुढील स्लाईड्समध्ये वाचा, सलमानची दत्तक बहीण अर्पिताविषयी...