आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केजरीवाल हे राजकीय नेतेच नव्हे तर गीतकारसुद्धा, \'दिल तो है दीवाना\'साठी लिहिले गीत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देशाची राजधानी दिल्लीचे नवनिर्माचित मुख्यमंत्री आणि 'आम आदमी पक्षा'चे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी भ्रष्टाचाराच्या विरोधात आंदोलन केल्यानंतर ते एखाद्या सेलिब्रिटीप्रमाणे प्रसिद्ध झाले आहेत.
पक्ष स्थापनेनंतर आणि आधीही त्यांनी अनेक आंदोलने केली, संघर्ष केला त्यानंतर ते दिल्लीचे मुख्यमंत्री झाले. त्यांनी केलेल्या प्रत्येक कार्याने त्यांना प्रसद्धीच्या शिखराकडे पोहोचवे. परंतु त्यांच्या काही छंदाविषयी लोक अनभिज्ञ राहिले आहेत.
अरविंद केजरीवाल यांनी गीतकारच्या रुपातसुद्धा स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. 'दिल तो है दीवाना' या सिनेमासाठी त्यांनी एक गीत लिहिले आहे. या सिनेमाची उर्वरित गाणी आम आदमी पक्षाचे नेते डॉ. कुमार विश्वास यांनी लिहिली आहेत. कुमार विश्वास हे एक प्राध्यापक असून हिंदी आणि उर्दूतील प्रसिद्ध कवी आहेत.
राजा बबुंदेला यांच्या दिग्दर्शनात बनलेल्या या सिनेमात आमिर खानचा सावत्र भाऊ हैदर अली खान चित्रपट क्षेत्रात पदार्पण करीत आहे. दीपक शर्माने या सिनेमाची निर्मिती केली असून, गीतांना विक्रम सूदने कम्पोज केले आहेत. सिनेमात हैदर अली खान व्यतिरिक्त झीनत आमान, राज बब्बर आणि सदा यांचीही मुख्य भूमिका असणार आहे.
पुढील स्लाइड्वर क्लिक करा आणि बघा या सिनेमातील स्टार्स...