आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजेश खन्नांच्या बंगल्यावरुन पुन्हा वाद; अनिताने डिंपल, अक्षयवर ठोकली केस

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राजेश खन्नांची लिव्ह-इन पार्टनर असल्याची दावा करणारी अनिता आडवाणीने बुधवारी राजेश खन्नांची पत्नी डिंपल कपाड़िया, मुलगी ट्विंकल खन्ना, रिंकी आणि जावई अक्षय कुमार यांच्याविरोधात घरातून जबरदस्तीने बाहेर काढल्याप्रकरणी स्थानिक कोर्टात तक्रार केली आहे.

अनिताने गेल्या वर्षीही अशाच प्रकारची तक्रार वांद्रा येथील कोर्टात दाखल केली होती. घरगुती हिंसा कायद्यानुसार दाखल केलेल्या तक्रारीत आपल्याला त्या घरात राहू देण्याची मागणी केली होती. त्यानंतर कोर्टाने दिवंगत राजेश खन्नांची पत्नी डिंपल कपाड़िया आणि इतर सदस्यांना नोटिस दिली होती. मात्र त्यानंतर खन्ना कुटुंबियाने मुंबई हायकोर्टात धाव घेतल्यानंतर या प्रकारणाची सुनावणी थांबली होती. हायकोर्टाने या प्रकरणाची सुनावणी 6 फेब्रुवारीला होणार आहे.

बुधवारी दाखल केलेल्या तक्रारीत अनिताने म्हटले आहे की, राजेश खन्नाच्या मृत्यूनंतर मला राजेश खन्नांच्या आशीर्वाद बंगल्यावरुन हाकलून दिले होते. आनिताने हा ही दावा केला आहे की, राजेश खन्नांच्या संपत्तींवर माझा संबंध नसल्याचे कागदपत्रावर जबरदस्तीने सही घेतली आहे. त्यावेळी मानसिक व वैद्यकीयदृष्ट्या ठीक नव्हते.
पुढे वाचा, राजेश खन्नांच्या आशीर्वाद बंगल्याबाबत....