आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'गोलमाल' या सिनेमाच्या प्रॉडक्शन हाऊसची मालमत्ता बँकेने केली सील

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूडचे प्रसिध्द 'गोलमाल', 'जब वी मेट' आणि 'बोल बच्चन'सारखे सुपरहिट सिनेमे बनवणारी अष्टविनायक सिने व्हिजन लिमिटेड हे प्रॉडक्शन हाऊस गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा चर्चेत आहे. परंतु यावेळेस ते चुकिच्या कामासाठी चर्चेत आहे. या प्रॉडक्शन हाऊसचे मुंबई येथील तीन कार्यालये सील केले आहेत.
अष्टविनायक प्रॉडक्शन कंपनीवर भारतीय स्टेट बँकचे 29 कोटींचे कर्ज आहे, ज्यामुळे बँकेने कंपनीला नोटिस पाठवून अंधेरी परिसरातील व्हिआईपी प्लाजामधील कंपनीच्या 001, 204, 205 या तीन कार्यालयांना सील केले आहे.
काही महिन्यांपूर्वी 'एसबीआय'ने गहान ठेवून घेतलेल्या मालमत्तेसाठी कंपनीला नोटिस पाठविण्यात आली होती. त्यामध्ये स्पष्ट केले होते, की पोलिसांच्या मदतीने नोव्हेंबरच्या शेवटी त्यांचे कार्यालये बँक ताब्यात घेणार आहे, कदाचित कंपनाने या बाबीला गांर्भीयाने घेतले नाही.
या घटनेविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा