आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असिनला लागले लग्नाचे वेध, NRI बॉयफ्रेंडबरोबर अडकणार रेशीमगाठीत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
2012 साली अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी लग्नगाठीत अडकले. 2012 सालाप्रमाणेच 2013 यावर्षीही बी टाऊनमध्ये सनई चौघड्यांचे सूर ऐकू येत आहेत. अभिनेत्री उदिता गोसावी अलीकडेच दिग्दर्शक मोहित सुरीबरोबर लग्नगाठीत अडकली. आता म्हणे असिनलासुद्धा लग्नाचे वेध लागले आहेत. यावर्षी असिन आपल्या चाहत्यांना लग्नाची गोड बातमी देणार आहे.
असिन लवकरच आपल्या बॉयफ्रेंडबरोबर लग्नगाठीत अडकणार असल्याची चर्चा बी टाऊनमध्ये रंगत आहे. असिनचा बॉयफ्रेंड यूएसमध्ये वास्तव्याला असून ती आपल्या कामाच्या बिझी शेड्युलमधून वेळ काढून नेहमी त्याला भेटायला यूएसला जात असते. चला तर म्हणजे आता लवकरच असिनच्या घरीही सनई चौघडे वाजणार.