Home »Top Story» Audience Frightening The Bipash's Atma

बिपाशाच्या ‘आत्म्या’ला प्रेक्षक घाबरणार!

वृत्तसंस्था | Feb 13, 2013, 03:01 AM IST

  • बिपाशाच्या ‘आत्म्या’ला प्रेक्षक घाबरणार!

मुंबई - बंगाली बाला बिपाशा बसूने आतापर्यंत अनेक हॉरर चित्रपट केले आहेत. त्यामुळे मला मोठ्या पडद्यावर भीतिदायक चेह-याची ओळख मिळाली आहे, असा दावा बिपाशाने केला आहे. निर्माता विशेष भट्टच्या राज, राज 3, रामगोपाल वर्माच्या डरना जरुरी है, महेश मांजरेकरच्या रक्त यांसारख्या हॉरर चित्रपटांमध्ये बिपाशाने काम केले आहे. आता तिचा ‘आत्मा’ चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. यामध्ये ती नवाझुद्दीन सिद्दिकीसोबत दिसणार आहे.
काही भयपटांमध्ये काम केल्यामुळे मला मोठ्या पडद्यावर हॉरर चेह-याची ओळख मिळाली आहे.

मला अशा चित्रपटांसाठी विचारणा होत असेल तर त्यात काम करण्यात अडचण नाही. चांगली व्यक्तिरेखा मिळत असेल तर ती साकारण्यात काहीही गैर नाही, असे बिपाशाने सांगितले. भारतात हॉरर चित्रपट बाल्याअवस्थेत आहे. चित्रपट निर्मात्यांनी हा विषय मोठ्या स्वरूपात पुढे आणला पाहिजे. लोकांना चित्रपट पाहून भीती वाटावी असे सिनेमे तयार व्हायला हवेत. यामध्ये अनेक रोचक गोष्टींचा समावेश करता येऊ शकतो, असे बिप्स म्हणाली. सुपर्ण वर्मा दिग्दर्शित बिपाशा व नवाझुद्दीन सिद्दिकीच्या मुख्य भूमिका असलेला आत्मा 22 मार्चला प्रदर्शित होत आहे.

आत्मा 2 येणार
आत्मा प्रदर्शनाच्या वाटेवर असतानाच दिग्दर्शक सुपर्ण वर्माने आत्मा 2ची योजना पहिल्यापासूनच तयार असल्याचे म्हटले आहे. नवाझुद्दीनच्या निवडीबाबत सुपर्ण म्हणाला की, नवाझुद्दीनची भेट झाल्यानंतर त्याला चित्रपटाची ऑफर दिली, अन्यथा दुस-या कलाकाराचे नाव सुचवण्यास सांगितले होते. पटकथा ऐकल्यानंतर नवाझुद्दीनने काम करण्यास होकार दिला. त्याने याआधी कहानी, गँग्ज ऑफ वासेपूर व तलाश या चित्रपटात काम केले आहे. आत्मातील भावनात्मक पैलूमुळे चित्रपटाकडे ओढला गेलो. चित्रपटामध्ये मुल व आई-वडिलांमधील भावूक नाते परिणामकारकरीत्या चित्रित करण्यात आले आहे, असे नवाझुद्दीन म्हणाला.

Next Article

Recommended