आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aurangzeb Is The Boldest Trailor Fo Yashraj Films Till Date

यशराजच्या 'औरंगजेब'मध्ये साशा-अर्जुनची जबरदस्त केमिस्ट्री

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यशराज बॅनरच्या आगामी 'औरंगजेब' या सिनेमाचा ट्रेलर अलीकडेच लाँच करण्यात आला. या ट्रेलरमध्ये ग्लॅमर, ड्रामा आणि अ‍ॅक्शनचा तडका बघायला मिळतोय. या ट्रेलरला प्रेक्षकांची पसंतीची पावती मिळत आहे. विशेष म्हणजे 'औरंगजेब'चा ट्रेलर हा यशराज फिल्म्सचा आत्तापर्यंतचा सगळ्यात बोल्ड ट्रेलर असल्याचे म्हटले जात आहे.
या सिनेमात अर्जुन कपूर दोन वेगवेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. अर्थात या सिनेमात तो डबल रोलमध्ये झळकणार आहे. शिवाय अर्जुनबरोबर सलमा आगा यांची मुलगी साशाची जबरदस्त केमिस्ट्री बघायला मिळणार आहे. या सिनेमाद्वारे साशा बी टाऊनमध्ये एन्ट्री घेत आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा या सिनेमाच्या ट्रेलरची खास झलक...