आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीपिकाला नंबर वन बघण्याची अयानची इच्छा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिग्दर्शक अयान मुखर्जीसाठी दीपिका पदुकोण आता लकी शुभंकर बनली आहे. रेकॉर्डब्रेक व्यवसाय करणार्‍या ‘यह जवानी है दीवानी’च्या नायिकेसोबत अयान भविष्यातही सिनेमाचे नियोजन करत आहेत. एवढेच नाही तर दीपिका लवकरच बॉलिवूडमध्ये समवयीन अभिनेत्रींना मागे टाकत नंबर वन स्थान पटकावेल, असेही अयान मुखर्जीने म्हटले आहे. योगायोगाने अयानचे हे वक्तव्य ‘लव्ह आजकल’चे दिग्दर्शक इम्तियाज अली यांच्याशी मिळते-जुळते आहे. वेगाने पुढे जाणार्‍या दीपिकाने या प्रतिभावान दिग्दर्शकांचा आपल्या चाहत्यांच्या यादीत समावेश केला आहे, असे वाटते.