आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा'विकी डोनर' या सिनेमाद्वारे मोठ्या पडद्यावर झळकलेला अभिनेता आयुष्मान खुरानाचे निधन झाल्याची अफवा इंटरनेटवर पसरली आहे. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, आयुष्मान ठणठणीत असून तो सुखरुप आहे.
एका प्रसिद्ध वेबसाईटने इंटरनेटवर दिलेल्या बातमीनुसार, आयुष्मान आपल्या कुटुंबियांसमवेत सुटी घालवण्यासाठी स्वित्झर्लँडला गेला होता. स्नो बोर्डिंगदरम्यान दुर्घटना घडून त्यात त्याचा मृत्यू झाला. ही बातमी इंटरनेटवर आगीप्रमाणे पसरली आणि त्याच्या चाहत्यांनी त्याला श्रद्धांजली द्यायला सुरुवात केली.
ट्विटरवर आयुष्यामनच्या चाहत्यांनी ट्विट केले की,
" Is it true? Ayushman Khurana dead?"
" Wtff..ayushmann khurana ..is dead........in accident"
" #RIP Ayushmann Khurana"
ही अफवा पसरल्यानंतर आयुष्मानची प्रवक्ता मोनिका भट्टाचार्य यांना स्पष्टिकरण द्यायला समोर यावे लागले. त्यांनी सांगितले की, आयुष्मानबद्दल पसरलेली अफवा खोटी आहे. तो ठिक असून सध्या मुंबईतच आहे.
या अफवांमुळे आयुष्मान आणि त्याच्या कुटुंबियांना चांगलाच मनःस्ताप सहन करावा लागला आहे. तसे पाहता अशा प्रकारे इंटरनेटवर सेलिब्रिटीच्या मृत्यूची खोटी बातमी प्रकाशित झाल्याची ही पहिलीच वेळ नाहीये. यापूर्वीही बॉलिवूड आणि हॉलिवूडच्या अनेक दिग्गज कलाकारांच्या निधनाच्या बातम्या इंटरनेटवर आल्या आहेत.
आयुष्मान खुरानाबरोबरच कोणकोणत्या सेलिब्रिटींवर स्वतःच्याच निधनाचे वृत्त वाचण्याची वेळ आली, हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.