आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ayushman Khurana Servant Dead Body Found From His House

'विकी डोनर' फेम आयुष्मान खुरानाच्या घरात आढळला नोकराचा मृतदेह

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - 'विकी डोनर' या सिनेमाद्वारे बी टाऊनमध्ये एन्ट्री घेणारा अभिनेता आयुष्मान खुरानाच्या घरी त्याच्या नोकराचा मृतदेह आढळून आला आहे.
आयुष्मान खुरानाच्या गोरेगाव येथील घरातच त्याच्या नोकराचे शव गळफास लावून घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. शिवप्रसाद असे या नोकराचे नाव असून तो 26 वर्षांचा होता. गेल्या पाच ते सहा वर्षांपासून तो आयुष्मानच्या घरी काम करत होता.
शिवप्रसादने शनिवारीच गळफास लावून घेतल्याचा संशय व्यक्त केला जातोय. त्याने आत्महत्या का केली याचा शोध घेण्याचा पोलिस प्रयत्न करत आहेत.
शिवप्रसादच्या आत्महत्येमुळे आपल्याला मोठा धक्का बसला असल्याचे आयुष्मानने म्हटले आहे.