आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ayushmann Khurana And Bhoomi Pednekar In Dum Laga Ke Haisha

पाहा आयुष्मान खुरानाच्या 'दम लगा के हईशा'चा FIRST LOOK

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यशराज फिल्म्सच्या मार्केटिंग टीममधील परिणीती चोप्राने याच बॅनरच्या 'इश्कजादे' या सिनेमाद्वारे आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. आता या बॅनरच्या कास्टिंग टीममधील एक सदस्य भूमी पेडनेकरसुद्धा मोठ्या पडद्यावर आपले नशीब आजमावण्यासाठी सज्ज झाली आहे.
यशराज फिल्म्सच्या आगामी 'दम लगा के हईशा' या सिनेमात भूमी आयुष्मान खुरानासह स्क्रिन शेअर करणार आहे. अलीकडेच या सिनेमाची पहिली झलक रिलीज करण्यात आली. यामध्ये भूमी आणि आयुष्मान दोघेही डीग्लॅम लूकमध्ये दिसत आहेत.
यशराज फिल्म्सचे कास्टिंग डायरेक्टर शानू शर्माला भूमी असिस्ट करत होती. 'दम लगा के हईशा' या सिनेमाचे दिग्दर्शक मनीष शर्मा यांची नजर भूमीवर पडल्यावर त्यांनी तिला सिनेमासाठी ऑडिशन द्यायला सांगितले आणि त्यानंतर त्यांनी तिला सिनेमासाठी साइन केले.