आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करिअर ग्राफ उंचावण्याऐवजी खालावत चालल्याने आयुष्मान घाबरला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रणवीर सिंह, अर्जुन कपूर, सुशांतसिंह राजपूत यांची चित्रपटसृष्टीत यशस्वी वाटचाल सुरू आहे. पुलकित सम्राटला सलमान खान आणि फरहान अख्तर आपल्या बॅनरच्या चित्रपटांमध्ये घेत आहेत. एवढेच नाही, तर राजकुमार रावनेही आपले स्थान मजबूत करण्यात यश मिळवले आहे. या सर्वांच्या करिअरचा वाढता आलेख पाहून आयुष्मान खुराणामध्ये करिअरच्या बाबतीत असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
तीन वर्षांत त्याच्या करिअरचा आलेख खूप खालावला असून ‘बेवकुफियां’मध्ये अभिनेत्रीचा प्रियकर असूनही त्याचा नंबर ऋषी कपूर आणि सोनम कपूर यांच्यानंतर आला. एप्रिल 2012 मध्ये आलेल्या ‘विकी डोनर’ने त्याला चित्रपटसृष्टीतला प्रॉमिसिंग हीरो बनवले होते. यादरम्यान जॉन अब्राहमच्या कंपनीसोबत त्याने तीन चित्रपटांचे करार केले. ‘
विकी डोनर’च्या सहा महिन्यानंतरदेखील त्याच्याकडे दमदार पटकथेचा प्रस्ताव आला नाही. काही प्रस्ताव आले; पण आयुष्मानने मानधन वाढवल्यामुळे याबाबतची चर्चा पुढे सरकलीच नाही. त्यानंतर ‘नौटंकी साला’ चित्रपटाने एप्रिल 2013 मध्ये त्याच्या तरुण चाहत्यांना नाराज केले.
पुढे वाचा सविस्तर वृत्त...