आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बच्चन -रेखातील ‘दीवार’ तुटली!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - महानायक अमिताभ बच्चन आणि सौंदर्यसम्राज्ञी यांच्यातील मैत्रीच्या ‘सिलसिला’ गेल्या तीन दशकांपासून बॉलिवूडमध्ये चर्चेत आहे. त्याचा एक वेगळा पैलू मंगळवारी रात्री सिनेरसिकांना पाहायला मिळाला. निमित्त होते स्क्रीन अवॉर्ड सोहळ्याचे. या समारंभात बच्चन आणि रेखा यांची नजरानजर झाली. दोघांनी एकमेकांना अभिवादन केले. इतकेच नव्हे तर जया बच्चन यांनीही रेखा यांची विशेष भेट घेऊन त्यांनी नेसलेल्या साडीचे कौतुक केले. या आगळ्या भेटीचे साक्षीदार ठरलेल्या समस्त रसिकांनी हा क्षण मोबाइल, कॅमेर्‍यात टिपून घेतला.
मंगळवारी रात्री रंगलेलेल्या स्क्रीन अवॉर्ड सोहळ्यात मान्यवरांच्या रांगेत अभिनेत्री रेखा बसल्या होत्या. समारंभस्थळी आल्यानंतर अमिताभ स्वत: होऊन रेखा यांच्याकडे गेले. त्यांना नमस्कार केला. रेखा यांनीही हसून प्रतिसाद दिला. जया बच्चन यांनीही रेखा यांची भेट घेतली. त्या दोघींनी तसेच अमिताभ यांनीही रेखासमवेत आवर्जून छायाचित्रे काढून घेतली. अमिताभ-रेखा यांची मैत्री जया यांना आवडत नसल्याने बच्चन परिवार रेखा यांना टाळत असल्याचे चित्र अनेक समारंभांमधून दिसले. अमिताभ आणि रेखा हेदेखील भेटले तरी कधी एकमेकांना बोलताना दिसले नाहीत. या पार्श्वभूमीवर या भेटीमुळे त्यांच्यातील कटुता कमी झाल्याचे म्हटले जात आहे.
कथित प्रेमाचा ‘सिलसिला’
अमिताभ आणि रेखा यांच्या अफेअरची चर्चा बॉलिवूडमध्ये 1976 मध्ये सुरु झाली. दोघांनी अंजाने चित्रपटात सर्वप्रथम एकत्र काम केले. 1981 मधील ‘सिलसिला’ हा त्यांचा एकत्र काम केलेला अखेरचा सिनेमा होता. नंतरच्या काळात ते एकत्र दिसले नाहीत. त्यांच्यात फारसे बोलणेही झाले नाही. पण या भेटीने त्यांच्या मैत्रीची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.