आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bachchans Arrive From Delhi Post Holi Celebrations

होळीच्या सणानंतर दिल्लीहून परतले बच्चन कुटुंबीय, बघा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन होळी सणानंतर झाल्यानंतर दिल्लीवरून परतले आहेत. बिग बींसोबत मुलगा अभिषेक बच्चन, सून ऐश्वर्या राय बच्चन, नातं आराध्या हेसुध्दा दिसले. बच्चन कुटुंबीयांनी यावर्षी होळाचा सण साजर केला नाही. 17 मार्चला होळीच्या दिवशी अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेताचा वाढदिवस होता म्हणून कुटुंबातील सर्व सदस्य तिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी दिल्लीला गेले होते.
अमिताभ यांनी त्यांच्या टि्वटर अकाउंटवप पोस्ट टाकली, 'होळी 17 मार्च आहे. त्याच दिवशी माझी मुलगी श्वेताचा वाढदिवस आहे. त्यामुळे त्यादिवशी आम्ही तिच्यासोबत असणार आहोत. म्हणून आम्ही यावर्षी होळी साजरा करणार नाही.' सोबतच त्यांनी त्यांच्या चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा देऊन टि्वट केले, 'होळीच्या सणाच्या मुहूर्तावर सर्वांचे आयुष्य असेच रंगांनी भरलेले असो अशी प्राथना करतो. तुमच्या जीनवनात नेहमी आनंद असो.'
बच्चन कुटुंबीय जेव्हा दिल्लीवरून परतले तेव्हा बिग बी पांढ-या रंगाचा पठाण कुर्त्यामध्ये दिसले. त्यांनी त्यावर गोल्डन रंगाचे शॉट जॉकेट घातलेले होते. सोबतच, अभिषेक बच्चनने पांढ-या रंगाचा टी-शर्ट, निळ्या रंगाची जिन्स आणि केशरी रंगाचे जॉकेट घातलेले होते. ऐश्वर्याने काळ्या रंगाचा सुट परिधान केलेला होत आणि मुलगी आराध्या लाल रंगाच्या ड्रेसमध्ये दिसली.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा बच्चन कुटुंबीयांचे काही खास छायाचित्रे...