आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Banned Bollywood And Hollywood Movies In Pakistan

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

युद्धात चार वेळा भारताकडून परास्त झालेला पाकिस्तान बॉलिवूड सिनेमांवर काढतो राग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंकपाकिस्तानी सैनिकांच्या हल्ल्यात पाच भारतीय जवान शहीद झाले आहेत. संपूर्ण देशातून पाकिस्तानचा निषेध होत आहे. अधिकृत सुत्रांच्या माहितीनुसार भारतीय सैनिकांनीही पाकिस्तानकडून झाले ल्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले आहे.

तसे पाहता पाकच्यावतीने करण्यात आलेला हा पहिला भ्याड हल्ला नाहीये. यापूर्वीही अनेकदा पाकने भारतावर कुरघोडी केली आहे. काही महिन्यांपूर्वीच पाकिस्तानी सैनिकांनी भारतीय सैनिकाचे शीर कापून नेले होते. जानेवारी 2013 पासून पाकिस्तानने 43 वेळा शस्त्रसंधीचा भंग केला असून पूंछ भागामध्येच सातवेळा शस्त्रसंधी कराराचा भंग केला आहे.

भारत आणि पाकिस्तानला एकाचवेळी स्वातंत्र्य मिळाले. त्यानंतर 1948, 1965, 1971 आणि 1999 मध्ये भारत-पाकिस्तान युद्ध झाले आणि प्रत्येकवेळी पाकिस्तानलाच परास्त व्हावे लागले. तरीदेखील पाकिस्तानने भारताविरुद्ध कुरघोडी करण्याचे थांबवलेले नाही.

पाकिस्तानची वागणूक फक्त भारताबरोबरच नव्हे तर जगातील इतर देशांबरोबरसुद्धा चांगली नाहीये. तालिबानी फतवा जारी करुन अनेक सिनेमांना येथे बॅन करण्यात येतं. तर धार्मिक भावना दुखावल्याचे कारण देऊन पाकिस्तानमध्ये अनेक बॉलिवूड सिनेमांनाही बॅन करण्यात आले आहे.

अलीकडेच रिलीज झालेला 'भाग मिल्खा भाग' हा सिनेमाही पाकिस्तानात बॅन करण्यात आला. या सिनेमातील फरहान अख्तरच्या तोंडून निघालेल्या "मुझसे नहीं होगा, मैं पाकिस्तान नहीं जाऊंगा।" या संवादावर आक्षेप घेत हा सिनेमा पाकिस्तानने बॅन केला.

तसे पाहता भारतीय सिनेमावर बंदी घालण्याची पाकिस्तानची ही पहिलीच वेळ नाहीये. यापूर्वीही अनेक भारतीय आणि दुस-या देशातील सिनेमे कोणत्याही कारणाशिवा येथे बॅन करण्यात आले आहेत.

एक नजर टाकुया पाकिस्तानात बंदी घालण्यात आलेल्या सिनेमांवर...