आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Barjatya's Salman Khan Sonam Kapoor Film Titled 'Prem Ratan Dhan Payo

बडजात्यांच्या सिनेमाचे नाव 'बडे भैया' ऐवजी आता 'प्रेम रतन धन पायो'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'बडे भैया' हा सिनेमा सलमान खान आणि सोनम कपूर अभिनीत असणार हे सुरूवातीपासूनच सांगितले जात होते. परंतु राजश्री बॅनरचे कर्ता-धर्ता आणि दिग्दर्शक सूरज ब़डजात्या यांने सांगितले, की सिनेमाचे शिर्षक बदलले जाणार आहे. अर्थातच बदलले आहे.
या सिनेमाचे नाव आता 'बडे भैया' नसून 'प्रेम रतन धन पायो' असे ठेवण्यात आले आहे. म्हणजेच सलमानच्या पात्राचे नाव पुन्हा एकदा प्रेम असणार आहे. सिनेमाची शुटिंग मेमध्ये सुरू होणार असून याची अधिक शुटिंग मुंबईच्या जवळील करजतमध्ये शुट होणार आहे.
तिथे प्रसिध्द डिझाइनर नितिन चंद्रकांत देसाईचे स्टुडिओ आहे. त्यामुळे सिनेमाची शुटिंग इथेच होणार हे निश्चित. 'जोधा-अकबर'सारख्या अनेक सिनेमांची इथे शुटिंग झाली आहे. 'प्रेम रतन धन पायो'मध्ये अनुपम खेर, स्वरा भास्कर. नील नितिन मुकेश आणि दीपक डोबरियाल यांच्यासुध्दा महत्वपूर्ण भूमिका आहेत. हा सिनेमा पुढील वर्षी दीवाळीच्या मुहूर्तावर रिलीज होई शकतो.