आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • B’DAY: 46 By Bobby Deol, Know What Film Career

B’DAY SPL: 46 वर्षाचा झाला बॉबी देओल, जाणून घ्या फिल्मी करिअरचा प्रवास

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूडचे 'हीमॅन' अर्थातच धर्मेंद्र यांचा धाकटा मुलगा बॉबी देओलचा आज 46वां वाढदिवस आहे. भारतीय सिनेमा इंडस्ट्रीत बॉबी देओलला एक यशस्वी अभिनेता म्हणून ओळखले जाते. त्याची दुसरी ओळख सनी देओलचा धाकटा भाऊ अशी देखील आहे. बॉबीने 90च्या दशकातच अभिनेता म्हणून ओळख निर्माण केली होती. त्याने 1995मध्ये 'बरसात' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. बॉबीचा हा पहिला सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट झाला होता.
बॉबी धर्मेंद्र यांची पहिली पत्नी प्रकाश कौर यांचा मुलगा आहे. त्याचा जन्म 27 जानेवारी 1967मध्ये मुंबई येथे झाला होता. बॉबीला विजेयता आणि अजीता या दोन बहीणी आहेत. सोबतच ईशा आणि आह्नासुध्दा त्याच्या बहिणी आहेत ज्या धर्मेंद्र यांची दुसरी पत्नी हेमामालिनी यांच्या मुली आहेत. हेमामालिनीचे नाव भारतीय सिनेमातील यशस्वी अभिनेत्रींमध्ये घेतले जाते. बॉबी देओलचे लग्न तान्या आहूजासोबत झाले आहे. त्याला दोन मुले आहेत, त्यांचे नाव आर्यमान आणि धरम आहे.
अभिनेता बॉबी देओलने त्याच्या फिल्मी करिअरची सुरूवात जरी 1995मध्ये प्रदर्शित झालेल्या 'बरसात' सिनेमामधून केली असली तरी त्याने 'धरम वीर' सिनेमात बालकलाकारची भूमिका केली होती. त्या सिनेमात बॉबीने धर्मेंद्र यांच्या बालपणीची भूमिका साकारली होती.
बॉबी देओलच्या काही हिट सिनेमांविषयी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...