आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • B\'DAY: Jackie Lived In Chawl, \'showman\' And \'hero\' Change Their Destined

B\'DAY SPL: चाळीत राहात होते जॅकी श्रॉफ, \'शो मॅन\'ने \'हीरो\' बनवल्यानंतर पालटले नशीब

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदी सिनेसृष्टीत 'शो मॅन' म्हणून ओळखले जाणारे दिग्दर्शक सुभाष घई यांनी 1983 मध्ये 'हीरो' सिनेमा बनवला होता. हा फिल्म इंडस्ट्रीतील असा काळ होता, जेव्हा मोठ्या पडद्यावर अमिताभ बच्चन, धर्मेंद्र या सुपरस्टार्सची जादू चालत होती. अशा वातावरणात सुभाष घई यांनी एका अशा अभिनेत्याला हीरोच्या रुपात सादर केले जो पूर्णतः टपोरी होती, त्याची बोलण्याची स्टाईल बंबईया होती, त्याच्या चेह-यावर लांब केसांसह दाढी आणि मिशी वाढलेली होती. अशा रुपातला तरुण सुभाष घई यांच्या 'हीरो' सिनेमाला यश मिळवून देऊ शकेल का? याविषयी शंका उपस्थित करण्यात आली होती. मात्र तरीदेखील सुभाष घई यांनी त्याला जॅकी नावाने लाँच करत फिल्म इंडस्ट्रीचा 'हीरो' बनवले. 'हीरो' या सिनेमात जॅकीची भूमिका ज्या अभिनेत्याने साकरली होती, त्याला सर्वजण जॅकी श्रॉफ या नावाने ओळखतात. आज जॅकी दादांचा वाढदिवस असून त्यांनी वयाची 53 वर्षे पूर्ण केली आहेत.
1983 साली 'हीरो' सिनेमाद्वारे आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात करणा-या जॅकी श्रॉफ यांचा जन्म 1 फेब्रुवारी 1960 रोजी गुजराती कुटुंबात झाला होता. जॅकी दादांचे पूर्ण नाव जय किशन श्रॉफ असे आहे. सिनेमांत झळकण्यापूर्वी जॅकी यांनी काही जाहिरातीत काम केले होते. मात्र 'हीरो' या सिनेमानंतर त्यांचे करिअर यशोशिखरावर पोहोचले. त्यांचे फिल्मी करिअर आजही सुरु आहे. अलीकडेच आमिर खानच्या 'धूम 3' या सिनेमात त्यांनी छोटेखानी भूमिका साकारली होती.
जॅकी श्रॉफ यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला त्यांच्याविषयीच्या खास अशा दहा गोष्टी सागंत आहोत, ज्या त्यांच्या चाहत्यांना ठाऊक नसाव्यात. पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या प्रेक्षकांच्या लाडक्या जॅकी दादांविषयी...