आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • B’DAY: Shahid Kapoor Affairs With Bollywood Actress

B’day: आक्षेपार्ह MMSपासून ते PCच्या घरी रंगेहाथ पकडे जाण्यापर्यंत, असे होते शाहिदचे अफेअर्स

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईला मायानगरी यासाठी म्हटले जाते, कारण येथे एका रात्रीत लोकांचे नशीब पालटत असते. बॉलिवूडचे असे अनेक स्टार्स आहेत, ज्यांना त्यांच्या एका सिनेमाने सुपरस्टार पद बहाल केले. या स्टार्सच्या यादीतील एक नाव म्हणजे अभिनेता शाहिद कपूर. सध्या तो बॉलिवूडमध्ये 'आर... राजकुमार' या नावाने प्रसिद्ध झालाय.
25 फेब्रुवारी 1981 रोजी जन्मलेल्या शाहिदने वयाची 32 वर्षे पूर्ण केली आहेत. आपल्या फिल्मी करिअरमध्ये त्याने अनेक चढउतार बघितले. 2003मध्ये 'इश्क विश्क' या सिनेमाद्वारे आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात करणा-या शाहिदला सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा फिल्मफेअर अवॉर्ड मिळआला. आपल्या दहा वर्षांच्या फिल्मी करिअरमध्ये शाहिदने फिदा, शिखर, विवाह, जब वी मेट, कमीने आणि आर... राजकुमार हे हिट सिनेमे दिले.
बॉलिवूडच्या या स्टारची सिनेमांची यादी जेवढी मोठी आहे, तेवढीच त्याच्या अफेअरची यादीसुद्धा बरीच लांबलचक आहे. फिल्म इंडस्ट्रीत पाऊल ठेवताच करीना कपूरसह त्याचे अफेअर सुरु झाले. करीना आता सैफ अली खानची बेगम झाली आहे.
करीनासह ब्रेकअप झाल्यानंतर प्रियांका चोप्रा, विद्या बालन, अनुष्का शर्मा, बिपाशा बसू, अमृता राव, सोनाक्षी सिन्हा आणि हुमा कुरैशीसह शाहिदचे नाव जोडले गेले.
शाहिदने मात्र आपल्या या सर्व अफेअर्सला नेहमी नाकारले. अभिनेत्रींबरोबर नाव जोडले गेल्याने तो नाराजसुद्धा झाला. मात्र त्याच्या या अफेअर्सचे सत्य कॅमे-यापासून लपू शकले नाही. करीनासोबतचा त्याचा आक्षेपार्ह अवस्थेतील एमएमस लीक झाला होता, तर प्रियांकाच्या घरीसुद्धा तो आढळून आला होता. शाहिदच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक नजर टाकुया त्याच्या अफेअर्सवर..