आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • B’Day Spl: Know Facts About Actress Nimrat Kaur Life

B’day Spl: जाणून घ्या 'लंचबॉक्स' फेम निरमत कौरच्या आयुष्यातील खास गोष्टी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'लंचबॉक्स' या सिनेमाद्वारे आपली स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री निरमत कौर हिचा आज 31 वा वाढदिवस आहे. 13 मार्च 1982 रोजी राजस्थानच्या पिलानी येथे निरमतचा जन्म झाला होता. आज तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला तिच्या आयुष्यातील काही खास गोष्टी सांगत आहोत...
निरमतचे वडील मेजर भूपिंदर सिंह यांची सतत बदली होत राहिल्याने वेगवेगळ्या शहरात तिचे बालपण गेले. अरुणाचल, पटियाला, बठिंडा या शहरांत ती खूप काळ राहिली.
बी. कॉममध्ये पदवी प्राप्त केल्यानंतर निरमतने आवड म्हणून थिएटरमध्ये काम करायला सुरुवात केली. मात्र नंतर तिने अभिनयातच करिअर करण्याचा निर्णय घेतला. मुंबईत येऊन तिने अनेक ऑडीशन्स दिल्या.
सोनीच्या 'तेरा मेरा प्यार' या अल्बममध्ये निरमतने काम केले होते. कुमार सानू आणि श्रेया घोषाल यांनी या अल्बमला स्वरसाज चढवला होता. हा अल्बम हिट ठरला. त्यानंतर तिला वेगवेगळ्या प्रॉडक्शन हाऊसकडून ऑफर्स यायला सुरुवात झाली.