आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • B’Day: Villain To Comedian, Actor Anupam Kher Fit In Every Act

B’day Spl: खलनायकापासून ते विनोदी भूमिकांपर्यंत, प्रत्येक भूमिकेत अनुपम खेर आहेत फिट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूडचा इतिहास 100 वर्षांपेक्षा अधिक जूना झाला आहे. या गेल्या वर्षांमध्ये फिल्म इंडस्ट्रीमध्ये अनेक अभिनेत्यांनी आपल्या करिअरचा आलेख कधीच खाली घसरू दिला नाही. या अभिनेत्यांच्या यादीमध्ये अनुपम खेर यांचेही नाव आग्रगण्य आहे. मागील 32 वर्षांमध्ये त्यांनी अभिनयाच्या बळावर बॉलिवूडमध्ये बरेच नाव कमवले. त्यांनी 1982मध्ये फिल्मी करिअरला सुरूवात असून विविध भूमिका साकारून फिल्मी करिअरला वाढवत गेले. त्यांच्या प्रत्येक अभिनयाची एक वेगळीच छाप बॉलिवूडच्या सिनेमांवर पडली आहे. बॉलिवूडच्या या दिग्दज अभिनेत्याने त्यांचे आज 58 वर्षे पूर्ण केली आहे.
अनुपम यांनी फिल्म इंडस्ट्रीमध्ये अनेक भूमिका साकारल्या, परंतु त्यांची ओळख तीन भूमिकांमध्ये होते. एक खलनायक, दुसरी विनोदवीर आणि तिसरी कौटुंबीक भूमिका या अभिनयांचा त्यामध्ये सामावेश आहे. त्यांनी आतापर्यंत 470 सिनेमांमध्ये काम केले आहे. त्यांच्या भारतीय सिनेमांमधील मोठ्या योगदानासाठी त्यांना भारत सरकार पद्यश्री पुरस्कारने सन्मानित करण्यात आले आहे.
त्यांनी 1982मध्ये 'आगमन' सिनेमामधून फिल्म इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले. त्यानंतर 1984मध्ये तयार झालेल्या 'सारांश' सिनेमामधील अभिनयाने सर्वांनाच तोंडात बोट घालायला लावली होती. या सिनेमात त्यांनी एका वडीलांची भूमिका साकारली होती. त्यामध्ये त्यांचा मुलगा हरवलेला असतो. या सिनेमाच्या यशानंतर त्यांनी कधीच मागे वळून बघितले नाही.
खलनायकाची भूमिका
अनुपम खेर यांनी त्यांच्या फिल्मी करिअरची सुरूवात एका अभिनेत्याच्या रुपात केली होती. परंतु 1986मध्ये प्रदर्शित झालेल्या 'कर्मा' सिनेमामध्ये त्यांनी जेव्हा 'डॉक्टर मायकल डेंग'ची भूमिका केली. तेव्हापासून त्यांचे नाव खलनायकाची भूमिका साकारणा-या स्टार्सच्या यादीत सामील झाले. त्यांच्या या भूमिकेने पडद्याच्या बाहेरसुध्दा लोकांना घाबरण्यास भाग पाडले होते. या सिनेमाचा ‘इस थप्पड़ की गूंज सुनी तुमने? अब इसी गूंज की गूंज तुम्हें जिंदगीभर सुनाई देगी’ हा डायलॉग बराच प्रसिध्द झाला होता. 'कर्मा'नंतर त्यांनी अनेक सिनेमांत खलनायकाच्या भूमिका साकारल्या.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या अनुपम खेर यांच्या विनोदवीर आणि कौटुंबीक भूमिकेविषयी...