आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Behind The Scene: Kareena Kapoor Joins Saif Ali Khan On The Sets Of Humshakals

PICS: करीनाने दिले सैफला सरप्राईज, शूटिंग बघण्यासाठी पोहोचली सेटवर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बॉलिवूडचा नवाब अर्थातच सैफ अली खान सध्या त्याच्या आगामी 'हमशक्ल' या सिनेमाच्या शुटिंगमध्ये बिझी आहे. तर दुसरीकडे त्याची बेगम करीना कपूरकडे वेळच वेळ दिसतोय. म्हणूनच करीना सैफच्या शुटिंग सेटवर पोहोचली आणि सैफला आश्चर्याचा धक्का दिला.सेटवर तिने सिनेमाच्या सपोर्टिंग स्टाफसोबत बातचित केली.
सैफच्या सिनेमाचे शुटिंग सध्या मुंबईतील एक मॉलमध्ये सुरु आहे. त्यावेळी सैफ आणि ईशा गुप्तावर शॉपिंगचा एक सीन चित्रीत होत होता.
साजिद खान हा सिनेमा दिग्दर्शित करत आहेत. साजिदचा 'हिम्मतवाला' हा मागील सिनेमा बॉक्स ऑफिसवर आपटला होता. त्यामुळे तो आता सैफसोबत आपले नशीब आजमावणार आहे. या सिनेमासाठी साजिद आणि सैफ बरीच मेहनत घेत आहेत.
तर करीना कपूरचे यावर्षी बरेच सिनेमे रिलीज होणार आहेत. तिच्या आगामी सिनेमांच्या यादीत बदतमीज दिल, गब्बर. हॅपी एंडिंग यांचा समावेश आहे. हॅपी एंडिंगमध्ये करीना आणि सैफ एकत्र झळकणार आहेत.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन पाहा शुटिंग सेटवर पोहोचलेल्या करीनाची खास झलक...