आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Behind the scenes Of Guild Awards: Deepika Padukone Gets Naughty With Ranveer Singh

Behind-the-scenes of Guild Awards: बघा दीपिका-रणवीरच्या खट्याळपणासह बरंच काही...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अलीकडेच मुंबईत स्टार गिल्ड अवॉर्ड सोहळा मोठ्या थाटात पार पडला. या अवॉर्ड सोहळ्यात 'गुंडे' स्टार अर्जुन कपूर आणि रणवीर सिंह, दीपिका पदुकोणसोबत मस्तीच्या मूडमध्ये दिसले. रेड कार्पेटवर हे त्रिकुट धमाल करत होतं. तर दुसरीकडे सोनाक्षी सिन्हा आणि करीना कपूर फोटोग्राफर्सना चक्क एकत्र पोज देताना दिसल्या. यावेळी सोनाक्षीने ब्लॅक टाइट ड्रेस परिधान केला होता, तर करीना गोल्डन आणि सिल्व्हर कॉम्बिनेशनच्या गाऊनमध्ये दिसली. रेड कार्पेटवर सोनाक्षीचा तोल ढासळताना दिसला. मात्र लगेचच तिने स्वतःला सावरले. त्यानंतर सोनाक्षी 'आर... राजकुमार'मधील तिचा को-स्टार शाहिद कपूर आणि दिग्दर्शक प्रभूदेवासह पोज देताना दिसली.
बॉलिवूड स्टार्सयाशिवाय 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल'मधील पलकचे पात्र साकारणारा अभिनेता किकू बिपाशा बसूसह धमाल करताना दिसला.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला स्टार गिल्ड अवॉर्ड्सचे बिहाईंड द सीन्स दाखवत आहोत. पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा कलाकारांनी कशी केली धमाल...