आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bengali Actress Rituparna Sengupta Detained At Toronto Airport

बंगाली अभिनेत्रीला टोरंटोत रोखले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकाता - बंगाली अभिनेत्री रितुपर्ण सेनगुप्ता हिला शुक्रवारी चुकीचा व्हिसा असल्याचे सांगून कॅनडाच्या टोरँटो विमातळावर पाच तास रोखण्यात आले. ‘मुक्ती’ या बंगाली चित्रपटाच्या प्रीमियरसाठी ती टोरँटोला गेली आहे. भारतीय वकिलातीच्या हस्तक्षेपानंतर तिची सुटका करण्यात आली. रितुपर्णकडे सन 2010 मध्ये जारी करण्यात आलेला बी वन व्हिसा असून त्याची मुदत सन 2015 पर्यंत आहे. अनवधानाने पुन्हा व्हिसासाठी अर्ज केल्यामुळे ती अडचणीत आली.

मुक्ती चित्रपटाचा उद्या रविवारी प्रीमियर शो होत आहे. या शोसाठी मी आले होते, परंतु विमातळावर भयंकर प्रसंगातून मला जावे लागले.टोरँटो विमातळावर अधिकारी मला प्रवेशच देत नव्हते असे रितुपर्णने फोनवर सांगितले.व्हिसा असताना पुन्हा दुसर्‍या व्हिसासाठी अर्ज का केला याविषयी अधिकारी खोदूनखोदून चौकशी करीत होते असे ती म्हणाली.