वर्ष 2013 ला बायबाय करण्याचे काउंटडाऊन सुरु झाले आहे. यावर्षी फॅशन जगतामध्ये भारतीय मूल्याला कोणी महत्वाचे स्थान दिले असेल तर ते साडीने. साडी भारतीय महिलांचा मुख्य पोशाख आहे. भारतामध्ये सणासुदीच्या काळामध्ये साडीला खूप महत्व आहे. वर्ष 2013 मध्ये शेफॉन, नेट, लाइट वेट साड्यांची मागणी भरपूर प्रमाणात झाली. या व्यतिरिक्त बोल्ड आणि युनिक प्रिंट्सच्या साड्या खूप चर्चेत राहिल्या.
ब्राइडल फॅशन वीक, विल्स लाइफस्टाइल इंडिया फॅशन वीक, अॅम्बी वैली इंडिया ब्राइडल फॅशन वीक आणि लॅक्मे फॅशन वीक इ. सर्वात यशस्वी आणि चर्चित फॅशन शोमध्ये सेलिब्रिटीनी साडी परिधान करून उपस्थितांची मने जिंकून घेतली.
पुढील फोटोंवर क्लिक करा आणि पाहा विविध फॅशन शोमध्ये साडी परिधान करून सहभागी झालेल्या सेलेब्रेटी....