आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

TRAILER OUT: पाहा सोनम-आयुष्मानच्या \'बेवकूफियां\'ची झलक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यशराज बॅनरखाली तयार झालेला सोनम कपूर आणि आयुष्यमान खुराणा अभिनीत 'बेवकूफियां' सिनेमाच ट्रेलर लाँच झाला आहे. नुरूप अस्थानाने सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. विशेष म्हणजे या सिनेमात सोनमने बिकिनी लूक दिला आहे. सोबतच, आयुष्यमान खुराणासोबत इंटीमेट सीन्ससुध्दा दिले आहेत. हा सिनेमा 14 मार्चला रिलीज होणार आहे. आदित्य चोप्रा निर्मित या सिनेमात आयुष्यमान खुराणा, सोनम कपूर आणि ऋषि कपूर यांच्या मुख्य भूमिका आहेत. सिनेमात ऋषि कपूर सोनमचे वडील आहेत.
माधमवर्गीय प्रेमकथेवर आधारित हा सिनेमा आहे. ज्यामध्ये आयुष्यमानने एका मार्केटींग एक्झिक्युटीव्ह मोहित नावाच्या तरुणाची भूमिका साकारली आहे आणि सोनम एक फायनॅन्शिअल एक्झिक्युटीव्ह मायराच्या भूमिकेत दिसणार आहे. मायरा आणि मोहित एकमेकांवर खूप प्रेम करतात. परंतु मायराचे वडील (ऋषि कपूर) विचार करतात, की तिला एका श्रीमंत व्यक्तीच आनंदी ठेऊ शकतो. म्हणून ते मोहितचा तिरस्कार करतात. फक्त एवढीच कथा मोहित, मायरा आणि मायराचे वडील यांच्या अवतीभोवती फिरते. त्यामुळे सिनेमाच्या कथेत नाविन्य काहीच नाही, असं दिसतंय.
मात्र या सिनेमात दिसणारे वैशिष्ट्य म्हणजे सोनमचा बिकिनी लूक आणि आयुष्यमानसहचे तिचे इंटीमेट सीन्स. आपल्या करिअरमध्ये सोनमने पहिल्यांदाच किसींग सीन दिला आहे. हा सिेनेमा यावर्षी 14 मार्चला रिलीज होणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि पाहा सोनम-आयुष्यमानच्या आगामी बेवकूफियां या सिनेमाची खास झलक...