आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'मैं पाकिस्तान नहीं जाऊंगा...' या डायलॉगमुळे 'भाग मिल्खा भाग'वर बंदी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबई - 'फ्लाईंग सिख' म्हणून प्रसिद्ध असलेले धावपटू मिल्खा सिंग यांच्या आयुष्यावर बेतलेल्या 'भाग मिल्खा भाग' या सिनेमाच्या रिलीजवर पाकिस्तानात बंदी घालण्यात आली आहे. पाकिस्तानमध्ये बॉलिवूड सिनेमांचे अनेक चाहते आहेत. मात्र सिनेमातील एका डायलॉगवर आक्षेप नोंदवत पाकिस्तान सेंसॉर बोर्डाने सिनेमाच्या रिलीजवर बंदी घातली आहे.

'भाग मिल्खा भाग' या सिनेमात फरहान अख्तर मिल्खा सिंगच्या भूमिकेत आहे. सिनेमातील एका दृश्यात मिल्खाला पाकिस्तानात जाण्यासाठी सांगण्यात येतं. मात्र तो तिथे जाण्यास नकार देतो. कारण 1947 च्या दंगलमध्ये मिल्खा सिंगच्या कुटुंबीयांची निर्घृण हत्या करण्यात आली होती.

या डायलॉगवर आक्षेप घेत पाकिस्तान सेंसॉर बोर्डाने सिनेमाच्या रिलीजवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. तर दुसरीकडे या सिनेमाचे निर्माते व्हायकॉम 18 ने सिनेमात मिल्खा सिंग यांच्या आयुष्यातील सत्य दाखवण्यासाठी पाकिस्तानने घातलेल्या बंदीकडे दुर्लक्ष केले आहे.

राकेश ओमप्रकाश मेहरा दिग्दर्शित हा सिनेमा येत्या 12 जुलै रोजी रिलीज होणार आहे.