आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बॉलिवूडच्या 'भगवान'ला बंगला-गाडी विकून जावे लागले होते चाळीत राहायला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंदी सिनेसृष्टीतील अभिनेते आणि दिग्दर्शक भगवान दादा यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना बॉलिवूडचा 'भगवान' म्हटले जाते. 'अलबेला' या सिनेमातील 'शोला जो भडके...' या गाण्यामुळे भगवान दादा खूप लोकप्रिय झाले होते.
1919 मध्ये एका गिरणी कामगाराच्या घरी भगवान दादांचा जन्म झाला होता. भगवान दादांना बालपणापासूनच अभिनयात रुची होती. सुरुवातीच्या काळात त्यांनी मोलमजुरी केली, मात्र अभिनयातील त्यांची रुची कमी झाली नाही. मुकपटांच्या काळात त्यांनी 'क्रिमिनल' या सिनेमाद्वारे मोठ्या पडद्यावर पदार्पण केले.

हिंदी सिनेमात नृत्याची एक खास शैली रुजवणारे भगवान दादा अमिताभ बच्चनसह अनेक पिढीतील कलाकारांसाठी प्रेरणास्थान होते.
एकेकाळी कलाकारांना आपल्या इशा-यांवर नाचवणा-या भगवान दादांच्या करिअरचा ग्राफ घसरला तो घसरतच गेला. आर्थिक तंगीमुळे त्यांना उपजीविकेसाठी चरित्र आणि छोट्या-मोठ्या भूमिका कराव्या लागल्या होत्या.

भगवान दादा यांच्या खासगी आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...