आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

45 वर्षांची झाली भाग्यश्री, बघा तिचा ग्लॅमरस अंदाज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड अभिनेत्री आणि टीव्ही कलाकार भाग्यश्रीचा जन्म 23 फेब्रुवारी 1969ला शाही पटवर्धन कुटुंबात झाला. तिचे पूर्ण नाव राजकुमारी भाग्यश्री राजे पटवर्धन आहे. सांगलीचे राजा श्रीमंत विजयसिंहराव माधवराव पटवर्धन यांची ती मुलगी आहे. भाग्यश्रीने अभिनेता अमोल पालेकरव्दारा निर्मित 'कच्ची धूप' या मालिकेतून करिअरला सुरूवात केली होती. ही मालिका दुरदर्शनवर प्रसारित होत होती. तिने तिच्या फिल्मी करिअरची सुरूवात 'मैने प्यार किया' सिनेमामधून केली. या सिनेमात सलमान खान आणि भाग्यश्री यांनी एकत्र काम केले होते. यांची जोडी लोकांनी डोक्यावर घेतली होती आणि सिनेमासुध्दा बराच गाजला होता. राजश्री प्रोडक्शनचा या सिनेमानंतर भाग्यश्रीने एक-दोन सिनेमातच काम केले आणि बॉलिवूडमधून एक्झिट घेतली. त्यानंतर तिने तिचा बालपणीचा मित्र हिमालय दासानीसोबत लग्न केले. त्यांना अवंतिका आणि अभिमन्यू ही दोन मुले आहेत. सध्या ती तिच्या पतीसोबत मीडिया कंपनी चालवते.
आज भाग्यश्रीच्या बर्थडे निमित्त आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत तिचा ग्लॅमर अवतार... पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा भाग्यश्रीचा बॉलिवूडमधील ग्लॅमरस अदा...