आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Bhaskar Bollywood Awards : Vote For Your Favourite Item Number

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कुणाला द्याल पसंती, चमेलीच्या ठुमक्यांना की अनारकलीच्या डिस्कोला ?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशातील पहिला ट्रुली डेमोक्रेटिक अवॉर्ड असेलल्या 'भास्कर बॉलिवूड अवॉर्ड'साठी वोटिंग प्रक्रिया सुरु झाली आहे. आपल्या फेवरेट स्टारला वोट देऊन त्याच्याबरोबर रेड कार्पेटवर चालण्याची संधी तुम्हालाही मिळू शकते. 'भास्कर बॉलिवूड अवॉर्ड्स' वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये दिले जाणार आहेत. 'आयटम नंबर ऑफ द इयर' या कॅटेगरीतही नॉमिनेशन्स आहेत. प्रत्येक कॅटेगरीप्रमाणे याही विभागात टफ कॉम्पिटीशन पाहायला मिळत आहे.
या कॅटेगरीत पहिले नॉमिनेशन मिळाले आहे 'अनारकली डिस्को चली' या गाण्याला. 'हाऊसफूल २' या चित्रपटातील या आयटम नंबरवर मलायका अरोराने जबरदस्त ठुमके लावले होते. या चित्रपटाबरोबरच हे आयटम नंबरही हिट झाले.
'अग्निपथ' चित्रपटातील 'चिकनी चमेली'चा या कॅटेगरीत दुस-या क्रमांक लागतो. कतरिना कैफच्या तिच्या करिअरमधला हा पहिला आयटम नंबर होता. या गाण्याला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. हा चित्रपट १०० कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे.
संवेदनशील अभिनय आणि कमालीची संवाद शैली असलेल्या विद्या बालनने सुद्घा आयटम नंबरमध्ये आपला हात आजमावला आहे. 'फरारी की सवारी' या चित्रपटातील 'मला जाऊ द्या ना घरी' या आयटम नंबरमध्ये विद्या मराठी अंदाजात ठुमके लावताना दिसली. या गाण्याला तिसरे नॉमिनेशन मिळाले आहे.
या विभागात चौथा क्रमांक लागतो तो 'राऊडी राठौर' या चित्रपटातील 'प्रीतम प्यारे' या आयटम नंबरचा. एकाच गाण्यात तीन-तीन अभिनेत्रींनी आपला जलवा दाखवला होता. मुमैत खान, मरियम जकारिया आणि शक्ती मोहन या अभिनेत्री या गाण्यावर थिरकल्या होत्या.
'रा वन' चित्रपटातील 'छम्मक छल्लो' या गाण्याचीही वर्णी या नॉमिनेशन यादीत पाचव्या क्रमांकावर लागली आहे. अमेरिकन गायक एकॉनच्या देसी अंदाजाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. शाहरुख खान आणि करीना कपूर यांनी या गाण्यात धमाल केली.
'दम मारो दम' या चित्रपटातील आयटम साँगला सहाव्या क्रमांकावर नॉमिनेशन मिळाले आहे. या आयटम नंबरवर दीपिका पदुकोणचा जलवा पाहायला मिळाला.
आपल्या बिनधास्त अंदाजासाठी चर्चेत राहिलेल्या 'डेल्ही बेल्ही' चित्रपटातील 'आय हेट यू लाईक आय लव्ह यू' हे आयटम साँग कॉमिक फ्लेवरमुळे प्रेक्षकांच्या पसंतीला उतरले. या गाण्यात आमिर खानने परफॉर्म केले होते. डिस्को फाईटर बनलेल्या आमिरच्या या गाण्याला सातवे नॉमिनेशन मिळाले आहे.
'मॅक्सिमम' चित्रपटातील आयटम नंबरही या यादीत आहे. 'आ अंटे अम्लापुरम' या गाण्याला आठवे नॉमिनेशन मिळाले आहे.
भास्कर बॉलिवूड अवॉर्ड्समध्ये ज्युरी मेंबर नाही तर खुद्द प्रेक्षकच आपल्या आवडत्या कलाकाराची निवड करत असतात. आपल्या फेवरेट आयटम नंबरला वोट देण्यासाठी लॉग ऑन करा www.divyamarathi.com मत देण्याची अंतिम तारीख १४ ऑगस्ट २०१२ आहे.
टफ कॉम्पिटीशन ! विद्या, करीना, प्रियांका, कोणाला मिळणार अवॉर्ड ?
टफ कॉम्पिटीशन ! शाहरुख, अजय की रणबीर, कोण मारणार बाजी ?
कोण ठरणार 'फ्रेश फेस ऑफ द इयर' ?