आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिग बींनी लाँच केला 'भूतनाथ रिटर्न्स'चा ट्रेलर, बघा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - 2014चा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित 'भूतनाथ रिटर्न्स' या सिनेमाचा ट्रेलर 25 फेब्रुवारी रोजी मुंबईत लाँच करण्यात आला. या सिनेमात अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका आहे. या ट्रेलर लाँचिंगला अमिताभ बच्चन यांच्यासह सिनेमाची संपूर्ण टीम हजर होती. अमिताभ यांच्या हस्ते हा ट्रेलर लाँच करण्यात आला.
कसा आहे सिनेमाचा ट्रेलर...
‘भूतनाथ रिटर्न्स’ हा सिनेमा 2008मध्ये रिलीज झालेल्या ‘भूतनाथ’ या सिनेमाचा सीक्वेल आहे. सिनेमाचा ट्रेलर बघता मागील सिनेमाच्या तुलनेत या सिनेमात बिग बी प्रेक्षकांना कॉमेडीचा अधिक डोज देणार आहेत. ट्रेलरमध्ये बिग बी लहान मुलांना घाबरवण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र मुले त्यांना घाबरण्याऐवजी त्यांचीच मजा घेत आहेत.
ट्रेलरमधील प्रत्येक सीनमध्ये विनोद आहे. पार्टी तो बनती है या गाण्यात मुले बिग बींसह थिरकताना दिसत आहेत. मीकाने या गाण्याला स्वरबद्ध केले आहे. अभिनेता बोमन इराणीला ट्रेलरमध्ये फार स्थान नाहीये. बोमन यांची एक छोटीशी झलक ट्रेलरमध्ये दिसते.
नितेश तिवारी दिग्दर्शित या सिनेमाचे निर्माते भूषण कुमार आणि अभय चोप्रा हे आहेत. विशाल-शेखर, आणि सलीम-सुलेमान यांनी सिनेमाला संगीत दिले आहे. अभिनेता रणबीर कपूरचा कॅमिओ रोल सिनेमात आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन पाहा भूतनाथ रिटर्न्सच्या ट्रेलर लाँचिंगची खास छायाचित्रे...