आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bhottnath Returns Promotion With Amitabh Bachchan

अमिताभ यांनी केले \'भूतनाथ रिटर्न्स\'चे प्रमोशन, बघा छायाचित्रे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन त्यांच्या 'भूतनाथ रिटर्न्स'च्या जोरदार प्रमोशनमध्ये सध्या व्यस्त आहेत. 22 मार्चला अमिताभ यांनी सिनेमाचे प्रमोशन मुंबईच्या प्रभुदेवी येथे पोहोचले होते. यावळी सिनेमाचे निर्माता भूषण पटेल आणि अभय चोप्रासुध्दा उपस्थित होते. अमिताभ यांनी प्रमोशनवेळी सिनेमाच्या काही रंजक गोष्टी शेअर केल्या. विशेष म्हणजे, प्रमोशनवेळी सिनेमाचा बालकलाकार पार्थसुध्दा उपस्थित होता. त्याने सिनेमाचे अनुभव आणि त्याच्या भूमिकेविषयी सांगितले.
'भूतनाथ रिटर्न्स' हा एक हॉरर, कॉमेडी-ड्रामा सिनेमा आहे. ही सिनेमा 2003मध्ये आलेल्या 'भूतनाथ'चा सिक्वल आहे. 'भूतनाथ रिटर्न्स'मध्ये अएमिताभ बच्चन भूताच्या अवतारात दिसणार आहेत. तसेच शाहरुख खानने मागील 'भूतनाथ'प्रमाणे या सिनेमातही सहकलाकारची भूमिका साकारली आहे.
अमिताभ यांच्याव्यतिरिक्त बोमन ईराणी, अनुराग कश्यप आणि मराठी अभिनेत्री उषा जाधव यांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत. तसेच यावेळी रणबीर कपूर आणि शाहरुख खानसुध्दा सिनेमात कॅमिया भूमिकेत दिसणार आहेत.
'भूतनाथ रिटर्न्स' सिनेमाचे दिग्दर्शन नितेश तिवारीने केले असून विशाल-शेखर आणि सलीम-सुलेमान यांनी संगीत दिले आहे. 11 एप्रिल हा सिनेमा रोजी सर्व थिएटरमध्ये झळकणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा 'भूतनाथ रिटर्न्स'च्या प्रमोशनला पोहोचलेल्या स्टार्सची काही छायाचित्रे...