आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॉलिवूडमध्‍ये दिसू शकतात अमिताभ, दुस-यांदा मिळाली ऑफर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडमधील शहनशहा अमिताभ बच्‍चन लवक‍रच हॉलिवूड चित्रपटामध्‍ये दिसू शकतील. त्‍यांच्‍यासमोर बीबीसी आणि स्‍टारफील्‍ड या प्रोडक्‍शन कंपणीने हॉलीवूड चित्रपटात काम करण्‍याचा प्रस्‍ताव ठेवला आहे. हा चित्रपट विकास स्‍वरुप यांच्‍या कादंबरीवर आधारीत असेल. यापूर्वी अमिताभ यांनी नियोनार्डो डी केप्रियो निर्मित 'द ग्रेट गैट्सबी' या हॉलिवूड पटात काम केले होते. या चित्रपटात त्‍यांनी वोल्‍फमेश नामक व्‍यक्‍तीची एक छोटी भूमिका निभावली होती.

चित्रपट दिग्‍दर्शक पापलो ट्रापेरो हा चित्रपट दिग्‍दर्शित करणार आहेत. यापूर्वी स्‍वरुप यांच्‍या कादंबरीवर 'स्‍लमडॉग मिलेनिअर' चित्रपट बनवल्‍या गेला आहे.

परंतु या चित्रपटात अमिताभ काय भूमिका करतील याविषयी अजून खात्री झालेली नसून अमिताभपण हॉलिवूडमध्‍ये काम करतील का नाही याविषयी संभ्रम आहे.