रिअलिटी शो बिग बॉसचा सातवे पर्व शेवटच्या टप्प्यात आले आहे. या पर्वात स्पर्धकांमध्ये जास्तवेळ वादच झालेले दिसले. शोच्या काही स्पर्धकांना घराच्या बाहेर काढण्यात आलं आहे. आता फक्त काहीच स्पर्धक शोच्या ग्रँड फिनालेमध्ये आहेत. शोचा मजबूत स्पर्धक व्ही जे अँडीचं एविक्शन करण्यात आलं आहे. अँडीला मिड वीकमध्ये एलिमिनेट करून मोठा धक्का दिला आहे.
कोणालाच अपेक्षा नव्हती, की ग्रँड फिनालेच्या फक्त तीन दिवसांपूर्वी त्याला घराच्या बाहेर काढण्यात येईल. कारण अँडीला शोचा एक मजबूत स्पर्धक समजलं जात होतं. अँडीची स्तुती करणा-यांची संख्यासुध्दा जास्त होती. अँडीने त्याच्या विनोदी स्वभावातून सर्वांच्या मनावर राज्य केलं होतं. अँडीला मागील आठवड्यात सर्वाधिक मतं मिळाली होती. परंतू या आठवड्यात त्याला सर्वात कमी मतं मिळाली म्हणून त्याला घराच्या बाहेर काढण्यात आलं.
अँडीच खरं नाव आनंद विजय कुमार आहे. अँडी चॅनल 'व्ही' वर प्रसारित होणा-या रिअलिटी शोमुळे प्रसिध्द आहे.
आम्ही तुम्हाला व्हीजे अँडीचे काही न बघितलेली छायाचित्रे दाखवणार आहोत. अँडीचे हे छायाचित्रे बघून तुम्ही हसल्याशिवाय राहणार नाहीत..