आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'शुटआऊट अ‍ॅट वडाला\'चे होणार हटके लाँचिंग

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'शुटआऊट अ‍ॅट वडाला'च्या टीमने या सिनेमाची पहिली झलक मल्टी सिटीमध्ये लाँच करण्याची योजना आखली आहे.
19 जानेवारीला मुंबई, दिल्ली, अहमदाबाद, लखनऊ आणि हैदराबादमध्ये या सिनेमाची पहिली झलक लाँच करण्यात येणार आहे. यानिमित्ताने सिनेमातील कलाकार वेगवेगळ्या शहरांमध्ये भेट देणार आहेत. इतकेच नाही तर लाँचपूर्वी ते परफॉर्मसुद्धा करणार आहेत.

अनिल कपूर आणि एकता कपूर दिल्लीत जाणार आहेत. तर जॉन अब्राहम आणि कंगना राणावत मुंबईला भेट देणार आहेत. शिवाय सोनू सूद हैदराबादला, तुषार कपूर आणि रोनित रॉय अहमदाबादला तर मनोज बाजपेयी लखनऊ शहराला भेट देणार आहे.

विशेष म्हणजे यापद्धतीने सिनेमाचा फर्स्ट लूक लाँच करण्याची बॉलिवूडमधील ही पहिलीच वेळ आहे. आता या हटके प्रमोशनचा सिनेमाला कितपत फायदा होणार हे सिनेमा रिलीज झाल्यानंतरच कळेल.