आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिपाशाची कबुली, 'होय, हरमनसोबत माझे अफेअर आहे'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्लॅमरच्या दुनियेतील अफेअरच्या बातम्या प्रसारमाध्यमांनी पसरवलेल्या अफवा असल्याचे सिनेतार्‍यांचे नेहमीचे म्हणणे आहे. आता बिपाशा बसू आणि हरमन बावेजा यांचेच उदाहरण घ्या. अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानंतर हे दोघे एकमेकांवर प्रेम करत असल्याचे एका सूत्राकडून कळाले होते. मात्र, बिपाशाने एका मुलाखतीत यास नकार दिला. आता मात्र बिपाशाने या वृत्ताला दुजोरा देत हे सत्य असल्याचे सांगितले आहे.
बिपाशाने सांगितले की, हरमनसोबत माझ्या भेटी-गाठी होत आहेत. 35 वर्षीय या मॉडेल अभिनेत्रीने यापूर्वी डिनो मोरिया आणि जॉन अब्राहमसोबत प्रेमसंबंध प्रस्थापित केले होते. आता तिने 33 वर्षीय हरमनसोबत संबंध जोडले आहेत. बिपाशाने बुधवारी यासंदर्भात ट्वीट केले आहे की, ‘जे खरे आहे तेच मी सांगत आहे. होय, मी आणि हरमन जोडीदार आहोत.’