आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'आईपेक्षा मीडियालाच माझ्या लग्नाची घाई'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदूर - विवाहाबद्दल प्रसारमाध्यमांकडून सातत्याने विचारल्या जाणार्‍या प्रश्नावर बॉलिवूडची बंगाली ब्यूटी बिपाशा बसू वैतागली आहे. आईपेक्षा मीडियालाच माझ्या लग्नाची अधिक काळजी आहे, अशा शब्दांत तिने आपली भावना व्यक्त केली आहे.

जॉन अब्राहम याच्याबरोबर ब्रेकअप झाल्यानंतर बिपाशाचे नाव दिनो मोरियापासून अनेक अभिनेत्यांपर्यंत जोडले गेले. त्यांचे डेटिंग सुरू असल्याच्या चटपटीत बातम्या येत आहेत. त्यावर पत्रकारांनी बिपाशाला पुन्हा सवाल केला, आयुष्यात कधी सेटल होणार आहेस ? माझ्या आईपेक्षा मीडियाने मला असा प्रश्न विचारावा, त्यावर मी काय उत्तर देणार, असा प्रतिसवाल तिने केला. 34 वर्षीय बिपाशाची जॉनसोबत 2011 पासून रिलेशनशिप होती.

आगामी सिनेमा ‘आत्मा’ विषयी ती म्हणाली, या सिनेमात आईची भूमिका साकारणे माझ्यासाठी कठीण गोष्ट होती. कारण खर्‍या आयुष्यात आई होणे किती अवघड असते, याची मला जाणीव आहे. बॉलिवूडचे अनेक स्टार टीव्हीवर नशीब अजमावू लागले आहेत. त्यांच्या रांगेत बिपाशाही जाऊन बसणार आहे. कारण छोटा पडदा तिलाही खुणावू लागला आहे. याअगोदर टीव्ही कार्यक्रमांच्या निर्मात्यांशी संपर्क साधला होता. परंतु माझ्या व्यक्तिमत्त्वाला साजेशी भूमिका मिळण्याची मी प्रतीक्षा करत असल्याचे बिपाशाने स्पष्ट केले आहे.