बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री बिपाशा बसू लवकरच साखरपुडा करणार आहे. हो खरंच, तुम्ही बरोबर ऐकले. नुकतीच बातमी मिळाली आहे, की बिपाशा आणि तिचा प्रियकर हरमन बावेजा हे यांनी त्यांच्या नात्यावर शिक्कामोर्तब करण्याचा निर्णय घेतला आहे. मागील काही दिवसांपूर्वी त्यांनी त्यांच्या नात्याचा सार्वजनिकरित्या स्वीकार केला होता. आता तर त्यांनी स्पष्ट सांगितले आहे, की ते लवकरच साखरपुडा करणार आहेत.
हे शुभकार्य ती हरमनच्या 'ढिशक्यांऊ' सिनेमा रिलीज झाल्यानंतर करणार आहे. हरमानचा हा सिनेमा 28 मार्चला रिलीज होणार आहे. बिपाशाच्या जवळच्या एका मित्राच्या सांगण्यानुसार, दोघांच्या नातेवाईकांची या संगर्भात भेट झाली असून त्यांना या नात्याविषयी कोणतीही अडचण नाहीये.
दोघांच्या अफेअरच्या दिर्घकाळपासून बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये ब-याच चर्चा रंगल्या आहेत. परंतु आता या चर्चा पूर्णत: थांबल्या आहेत. सोबतच सिध्द झाले आहे, की दोघेही त्यांच्या नात्याविषयी गंभीर आहेत. एका मुलाखतीदरम्यान हरमन म्हणाला होता, 'आम्ही एकमेकांना चांगले ओळखतो. परंतु
अमिताभ बच्चन यांच्या 70व्या वाढदिवसाच्या पार्टीत आमची पहिली भेट झाली होती.' त्याने या मुलाखतीत बिपाशाची प्रशंसासुअध्दा केली होती. तो म्हणाला 'इंडस्ट्रीमध्ये खूपच आकर्षक लोक आहेत. परंतु बिपाशासारखे कुणीच नाहीये.'