आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Birhday Special: Amruta Singh Married With Saif Ali Khan

B\'DAY SPL: अमृतासिंहने स्वत:पेक्षा १२ वर्षांनी लहान एका नवाबासोबत केले होते लग्न

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गत काळातील प्रसिध्द अभिनेत्री आणि सैफ अली खानची पहिली पत्नी अमृता सिंहचा आज (9 फेब्रुवारी 1958) वाढदिवस आहे. अमृताचे वडील शावदरसिंह आर्मी ऑफिसर होते आणि आई रुखसाना सुल्ताना यांना राजकारणात रुची होती. अमृताने प्राथमिक शिक्षण दिल्लीच्या मॉडर्न स्कुलमधून पूर्ण केले. तिने तिच्या फिल्मी करिअरची सुरूवात 'बेताब' या सिनेमामधून केली होती. सनी देओलसोबत असलेल्या अमृताच्या या सिनेमाची बरीच प्रशंसा झाली होती आणि त्यांच्या जोडीला देखील खूप पसंती मिळाली होती. त्यानंतर अमृताने बरीच हिट सिनेमे बॉलिवूड दिले. ज्यामध्ये, 'मर्द', 'साहेब', 'चमेली की शादी', 'नाम' आणि 'खुदगर्ज'सारखे सिनेमे सामील आहेत. 1985मध्ये प्रदर्शित झालेला 'मर्द' सिनेमा अमृताच्या करिअरमधील सर्वात हिट सिनेमा ठरला.
मनमोहन देसाई यांनी दिग्दर्शित केलेल्या 'मर्द' सिनेमात अमृताला अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. 80च्या दशकात फक्त सनी देओलच नव्हे तर अमिताभ बच्चन, संजय दत्त आणि अनिल कपूर यांच्यासोबतही तिची जोडी पसंत केली गेली. 1991मध्ये अमृत सिंहने तिच्यापेक्षा 12 वर्षांनी लहान सैफ अली खानसोबत लग्न केले. सैफ अली खानपासून तिला सारा आणि इब्राहीम हे दोन मुल आहेत. 14 वर्षांच्या वैवाहिक जीवनानंतर त्यांनी 2004मध्ये घटस्फोट घेतला. दोघे एकमेकांपासून वेगळे झाल्यानंतर दोघांची मुले अमृतासोबत राहतात. बॉलिवूडमध्ये अमृता अशी अभिनेत्री आहे, जिने 80 आणि 90च्या दशकात आपल्या अदांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले होते. चला आज तिच्या वाढदिवसानिमित्त तिची काही खास छायाचित्रे बघूया.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि पाहा अमृताची काही सैफ अली खानसोबतची छायाचित्रे...