आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाहा बर्थ डे गर्ल कंगना राणावतच्या बालपणीची UNSEEN छायाचित्रे

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

20 मार्च 1987 रोजी हिमाचल प्रदेशमधील मनालीजवळील एका छोट्याशा गावात जन्मलेल्या कंगना राणावतचा आज (बुधवार) 26 वा वाढदिवस आहे. आघाडीची अभिनेत्री ठरलेल्या कंगनाने स्वबळावर हिंदी सिनेसृष्टीत हे स्थान पटकावले आहे. बालपणी कंगनाचा ग्लॅमर दुनियेशी कोणताच संबंध नव्हता.

कंगनाने शिक्षण पूर्ण झाल्यानंतर दिल्ली थिएटरमध्ये अरविंद गौरबरोबर काम करायला सुरुवात केली होती. आशा चंद्राकडून अभिनयाचे धडे गिरवल्यानंतर कंगना मुंबईत दाखल झाली. येथे एका रेस्तरॉमध्ये अनुराग बसूंनी कंगनाला बघितले आणि येथूनच तिच्या आयुष्याला नवीन कलाटणी मिळाली.

अनुरागने कंगनाला 'गँगस्टर' या सिनेमातील लीड फिमेलचा रोल ऑफर केला. 2006 नंतर कंगनाने कधीच मागे वळून बघितले नाही.

आज आम्ही कंगनाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तिच्या बालपणीची छायाचित्रे तिच्या चाहत्यांना दाखवत आहोत.