आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : जेव्हा कॅमे-यात कैद झाले 'रंगिला गर्ल'चे बोल्ड बिकिनी MOMENTS

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आज आपला 38 वा वाढदिवस साजरा करत आहे. 80 आणि 90च्या दशकात बॉलिवूडमधील प्रसिद्ध चेहरा म्हणून उर्मिलाला ओळखले जात होते. उर्मिलाचा जन्म 4 फेब्रुवारी 1974 रोजी मुंबईत झाला होता. मराठमोठ्या उर्मिलाने 1980 साली बालकलाकार म्हणून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. 1991 साली रिलीज झालेला 'नरसिंहा' या सिनेमात उर्मिला लीड हिरोइन म्हणून झळकली होती. मात्र राम गोपाल वर्मांच्या 'रंगीला' या सिनेमाने उर्मिलाला खरी प्रसिद्धी मिळवून दिली होती. 'रंगीला' सिनेमामुळे उर्मिलाला एका रात्रीत स्टारपद मिळाले होते. या सिनेमात तिने बिकिनीत आपला जलवा दाखवला होता. या सिनेमामुळे उर्मिलाला 'रंगीला गर्ल' नावाने ओळखले जाऊ लागले.
'रंगीला' सिनेमानंतर उर्मिला राम गोपाल वर्मांच्या मस्त, दौड, जंगल, भूत, एक हसनी थी या सिनेमांमध्ये झळकली होती.
सध्या उर्मिला मोठ्या पडद्यापासून लांब असून छोट्या पडद्यावरील रिअ‍ॅलिटी शो जज करताना दिसत आहे.
छायाचित्रांमध्ये पाहा उर्मिलाची बिकिनी अदा, जी आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे.